Ameesha Patel Reveal about Hrithik Rroshan Secret : अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांनी ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर दोघेही स्टार झाले. अमिषाने अलीकडेच हृतिकबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. तिने हृतिकचे एक सिक्रेटदेखील सांगितले.
रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमिषा म्हणाली, “आम्ही बालपणीचे मित्र होतो, पण जेव्हा मी अभ्यासासाठी अमेरिकेत गेले तेव्हा आमचा संपर्क तुटला. पण, आम्ही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भेटायचो, कारण माझे वडील आणि राकेश काका (राकेश रोशन) मित्र होते.”
अमिषा पुढे म्हणाली, “ऋतिक आणि माझा प्रवास चांगला गेला आहे. पण, हृतिकला नेहमीच शंका होती की मी ते करू शकेन की नाही. हृतिक शरीराच्या प्रत्येक भागासाठी एक डायरी ठेवतो. तो दररोज त्याच्यात काय समस्या आहे ते लिहितो, जेणेकरून उद्या जर त्याला डॉक्टरकडे जावे लागले तर त्याच्याकडे शरीराच्या प्रत्येक भागाच्या समस्येची संपूर्ण डायरी असेल; हे अजूनही कायम आहे.”
अमिषा म्हणाली, “आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे जेव्हा आम्ही आरशात पाहतो तेव्हा आम्हाला स्वतःमध्ये दोष दिसतात. मी त्याचे कितीही कौतुक केले तरी त्याला त्याच्या शरीरात एक दोष दिसतो, माझ्या बाबतीतही असेच होते.”
अमिषा पुढे म्हणाली, “आम्हाला दोघांनाही विश्वास नव्हता की आम्ही ते करू शकू की नाही, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की ‘कहो ना प्यार है’च्या रिलीजपूर्वीच आम्ही अनेक चित्रपट साइन केले होते, कारण लोकांनी आमच्याबद्दल ऐकले होते की आम्ही दोघे प्रतिभावान कलाकार आहोत.”
‘गदर’, ‘गदर २’, ‘रेस २’, ‘कहो ना प्यार है’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री अमीषा पटेलने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अमिषा पटेल नेहमीच बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडत असते. ती ज्या चित्रपटात काम करते, त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्याची चूक दाखवण्यासही ती मागेपुढे पाहत नाही. अमीषा पटेल आता पूर्वीप्रमाणे बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आजदेखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.