Amitabh Bachchan Becomes Highest Paid TV Host With KBC 17 : सलमान खान टीव्हीवर ‘बिग बॉस’ होस्ट करतो आणि त्याला टीव्हीवरील सर्वांत महागडा होस्ट म्हटले जात असे; पण आता एका सुपरस्टारने या बाबतीत सलमानलाही मागे टाकले आहे.

‘टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट’ हा टॅग आता सलमानकडे राहिलेला नाही. एका दिग्गज अभिनेत्यानं सलमान खानकडून हा टॅग हिसकावून घेतला आहे. एक दिग्गज अभिनेता आता ‘टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट’ ठरला आहे.

हा टॅग दुसऱ्या तिसऱ्या कोणा सुपरस्टारला मिळाला नसून प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या हिट क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनसह टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. त्यांनी २००० मध्ये केबीसी होस्ट म्हणून सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी तिसरा सीझन वगळता सर्व सीझन होस्ट केले. तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता. त्यानंतर अमिताभ यांनी पुन्हा ‘केबीसी’ची जबाबदारी स्वीकारली. अमिताभ बच्चन भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत महागडे होस्ट ठरले आहेत.

सलमान खान टीव्हीवर बिग बॉस होस्ट करतो आणि त्याला टीव्हीवरील ‘सर्वात महागडा होस्ट’ म्हटलं जायचं, पण आता मात्र सलमान खान नाहीतर अमिताभ बच्चन ‘टेलिव्हिजनचा सर्वात महागडा होस्ट’ ठरले आहेत.

बिग बॉस ओटीटी २ दरम्यान, सलमान खानला प्रत्येक वीकेंड का वारच्या एपिसोडसाठी १२ कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच त्याचे आठवड्याचे शुल्क सुमारे २४ कोटी रुपये होते. परंतु, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सलमान आठवड्यातून फक्त दोन दिवस बिग बॉससाठी शूटिंग करतो.

‘सियासत डॉट कॉम’च्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन ‘केबीसी १७’च्या प्रत्येक भागासाठी पाच कोटी रुपयांचे मानधन घेणार आहेत. हा शो आठवड्यातून पाच वेळा प्रसारित होणार आहे. याचा अर्थ असा होतो की, अभिनेत्याचं या शोसाठीचं आठवड्याचं मानधन २५ कोटी रुपये आहे.

‘बिग बॉस १७’ कधी होईल प्रसारित?

सोनी टीव्हीने अलीकडेच अमिताभ बच्चन आणि सुंबुल तौकीर यांचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याबरोबरच निर्मात्यांनी शोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चा १७ वा सीझन आता ११ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.