‘हाऊसफुल ५’ या कॉमेडी सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ‘हाऊसफुल ५’च्या गाण्यांनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. ‘हाऊसफुल ५’ आज (६ जून) थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’ या गाण्याचे हूकस्टेप क्वचितच कोणी विसरले असेल. ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ चित्रपटातील या गाण्यावर लाखो रील्स बनवण्यात आले होते आणि नोरा फतेहीचे हूक स्टेपही व्हायरल झाले होते.

अभिषेक बच्चनने ‘हाऊसफुल ५’ च्या ‘लाल परी’ या गाण्यातही हे हूकस्टेप केले आहे. निर्मात्यांनी अलीकडेच ‘लाल परी’ या गाण्याचा एक मजेदार बीटीएस व्हिडीओ रिलीज केला. यामध्ये जेव्हा अभिषेकने जमिनीवर झोपून नोरा फतेहीच्या स्टाईलमध्ये ‘हाय गर्मी’ हा हूकस्टेप केला, तेव्हा वडील अमिताभ बच्चनही हसले.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मुलगा अभिषेकच्या हूक स्टेपवर प्रतिक्रिया दिली आणि ‘लाल परी’ गाण्याचा बीटीएस व्हिडीओही शेअर केला. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण कलाकारांनी खूप मजा केली आणि खूप हसले, ज्याची एक झलक व्हिडीओमध्येदेखील दिसते.

अभिषेक बच्चनच्या नोरा फतेहीच्या हूकस्टेपवर प्रतिक्रिया देताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले, ‘टी ५४०२.. हाहाहा.. किती मजेदार, मजेदार आणि मजेदार.’

‘हाऊसफुल ५’ या दिवशी होतोय प्रदर्शित

‘हाऊसफुल ५’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे दोन वेगवेगळे क्लायमॅक्स असतील, जे वेगवेगळ्या थिएटरमध्ये दाखवले जातील. म्हणजेच हे दोन्ही क्लायमॅक्स पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट दोनदा पाहावा लागेल. ‘हाऊसफुल ५’ ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे, तर तरुण मनसुखानी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, चंकी पांडे, संजय दत्त, नाना पाटेकर, नर्गिस फाखरी, जॅकलिन फर्नांडिस, चित्रांगदा सिंग, जॉनी लिव्हर आणि फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत. ‘हाऊसफुल ५’ आज (६ जून) थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

‘हाऊसफुल’चा आत्तापर्यंतचा हा ५ वा भाग आहे. पहिला भाग २०१० मध्ये, दुसरा २०१२, तिसरा २०१६ आणि चौथा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सर्व भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. इतके कलाकार एका चित्रपटात एकत्र पाहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.