Amitabh Bachchan Shares Cryptic Post : मेगास्टार अमिताभ बच्चन हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच ओळखले जात नाहीत; तर आजकाल ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही ओळखले जातात. अभिनेते अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडियावर अशा काही पोस्ट करतात, जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच त्यांनी प्रेम या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, “लोक बोलतात, लोक नापसंत करतात, लोक शिवीगाळ करतात; पण शेवटी प्रेम नेहमीच जिंकते. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं. त्याबरोबर त्यांनी हार्ट इमोजीही शेअर केल्या आहेत.

पोस्ट समोर येताच, नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हो, शेवटी प्रेम नेहमीच जिंकते”, “तुम्ही बरोबर आहात, साहेब. या गोंधळलेल्या जगात, प्रेम नेहमीच जिंकते. तुमचे शब्द आपल्याला द्वेषाच्या पलीकडे जाऊन आपल्यातील बंध जपण्याची आठवण करून देतात”, “मीही तुमच्यावर प्रेम करतो” या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. काही वापरकर्ते ते रेखा यांच्याशी जोडत आहेत. अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्याशी आणि कामाशी संबंधित अनेक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. त्यामुळेच त्यांच्या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करतात.

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज बिग बींना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे.

वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. बिग बींची एक झलक पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन करीत आहेत.