Amitabh Bachchan Corona Positive: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १४’मुळे चर्चेत आहेत. पण त्यांना पुन्हा एकदा करोना व्हायरसची लागण झाली आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांची करोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी रात्री उशीरा त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांशी शेअर केली. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, “नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी.” अमिताभ बच्चन यांचं हे ट्वीट बरंच व्हायरल झालं असून त्यांचे चाहते ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- Video : जेव्हा सोनाली फोगाट यांच्यावर भडकला होता सलमान खान, पाहा नेमकं काय घडलं होतं

सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या प्रसिद्ध टीव्ही क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, बिग बी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शो सुरू राहील की नाही याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जर पुढील काही भागांचे शूटिंग अगोदरच झालेले असेल, तर शो आहे तसाच सुरू राहील. अन्यथा काही दिवस प्रेक्षकांना या शोची वाट पाहावी लागणार आहे.

आणखी वाचा-VIDEO: ‘लग्नाला उशीर का करतीयेस?’ अमिताभ यांनी विचारलेल्या या प्रश्नावर स्पर्धक ऐश्वर्याने दिलं मजेशीर उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांनाही बरीच उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.