नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. याची शूटिंग सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून गेल्या आठवड्यातच ते नागपुरात दाखल झाले. या शूटिंगसंदर्भात बिग बींनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी नागपूरकरांचे विशेष आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बींची एक झलक पाहण्यासाठी नागपूरच्या हॉटेलमध्ये आणि लॉबीमध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याचेच फोटो ट्विटरवर शेअर करत अमिताभ बच्चन यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत. ‘नागपूरकरांनी मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे.

वाचा : साराला डेट करण्याविषयी कार्तिक आर्यन म्हणतो..

गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग सुरू झाली आहे. नागपुरातील मोहननगर इथल्या सेंट जॉन स्कूलमध्ये सेट उभारण्यात आला आहे.

‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक साकारण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan thanks nagpur people while shooting for nagraj manjule jhund movie
First published on: 09-12-2018 at 17:57 IST