Amitabh Bachchan Latest Post : अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती सीझन १७’मुळे चर्चेत आहेत. त्यांचे चित्रपट आणि टेलिव्हिजन दोन्हींवर वर्चस्व आहे. मनोरंजक म्हणजे ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दिसतात.

अमिताभ बच्चन हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच ओळखले जात नाहीत, तर आजकाल ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही ओळखले जातात. अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडियावर अशा काही पोस्ट करतात, जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टने लोकांना आश्चर्यचकित केले आणि प्रश्न निर्माण केले. खरंतर, ८ ऑक्टोबर रोजी रात्री २:३० वाजता बिग बींनी एक्सवर ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले आहे, “नंतर मला कळले की ब्रह्मांड खोपडीत आहे.” बिग बींनी या पोस्टनंतर हसणारे इमोजी टाकले.

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला. एका नेटकऱ्याने लिहिले, “वयानुसार असं होतं…अंकल तुम्ही झोपा, रात्र झाली आहे खूप.” दुसऱ्याने लिहिले, विश्व लहान होत चालले आहे की खोपडी मोठी होत चालली आहे?”, एका व्यक्तीने म्हटले की, “जयाजींनी त्यांना हे सांगितले असावे.” दुसऱ्याने म्हटले की, “बिग बींनी हे ट्रकच्या मागे लिहिलेले पाहिले असावे.”

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज बिग बींना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे.

वयाच्या ८२ व्या वर्षीही अमिताभ बच्चन सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन करीत आहेत.