अंकिता लोखंडेने घेतला करोना लसीचा पहिला डोस; लस घेतांना केला स्वामींचा धावा

अंकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ankita-lokhande

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.

अंकिताने करोना प्रतिंबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाच्या वेळेचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यात तिने चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र लस घेताना अंकिता चांगलीच घाबरल्याचं या व्हिडीओत दिसतंय. त्यामुळे अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत लसाकरण केंद्रात लस घेण्यापूर्वी तिथल्या आरोग्य सेविका तिला काही सूचना देताना दिसतं आहेत. तर अंकिता मात्र चांगलीच घाबरल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रावरील परिचारिका तिला दिर्घ श्वास घेण्यास सांगत आहेत. यावर अंकिता घाबरून “बापरे..देवा..देवा..देवा” म्हणताना दिसतेय. या व्हिडीओत अंकितासोबत कुटुंबातील इतरही सदस्य असल्याचं लक्षात येतंय. ज्या अंकिताला धीर देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

पुढे प्रत्यक्ष लस घेताना मात्र अंकिता प्रचंड घाबरली आहे. लस देणाऱ्या आरोग्य सेविकेनं तिला हलकी सूई टोचेल असं सांगितलं. मात्र तरही अंकिताने “स्वामी..स्वामी” म्हणत स्वामींचा धावा सुरू केला. लस घेतल्यानंतर मात्र तिच्या जीवात जीव आला आणि ती हसू लागली. लस दिल्यानंतर काही तास काळजी घेण्यास अंकिताला सांगण्यात आलं. यावेळी “मला ताप येईल का?” अशी शंका अंकिताने उपस्थित केली.

वाचा: “हे ही दिवस जातील…. सरी सुखाच्या येतील”; व्हिडीओ शेअर करत शेवंता चाहत्यांना म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ” मी माझी लस घेतली, तुम्ही देखील तुमची लस शक्य तेवढ्या लवकर घ्या”असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केलाय़. मात्र अंकिताचा हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री रश्मी देसाईला हसू आवरणं कठीण झालं. रश्मीने कमेंट बॉक्समध्ये हसणारे स्माईली दिली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ankita lokhande got vaccinated foe covid 19 chants god name while take first does of vaccine kpw

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या