करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाउन आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला. मात्र या वाढत्या लॉकडाउनमुळे देशावर खुप मोठे आर्थिक संकट आले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत. या परिस्थितीवरुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. मात्र या टीकेवर अभिनेता अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे. मोदींच्या प्रयत्नातून सत्याचा सुवास दर्वळतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटतेय”; अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

सर्वाधिक वाचकपसंती – या चित्रपट दिग्दर्शकाने केली आत्महत्या

“काही लोक नरेंद्र मोदी यांच्या कामात व्यत्यय आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना यश मिळणार नाही. त्याच्या अपयशामागे दोन कारण आहेत. एक, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खुपच खराब आहे. दोन, त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.” अशा आशायाचे ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे.

अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते मुक्तपणे व्यक्त होताना दिसतात. ते आपल्या वक्तव्यांमधून प्रामुख्याने काँग्रेस पक्षावर टीका करतात. या पार्श्वभूमीवर त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.