बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेते अनुपम खेर यांचं नाव आदराने घेतलं जातो. अनुपम बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा सामाजिक, रायकीय विषय असो ते आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. तसेच ते सोशल मीडियावरही फार सक्रिय असतात. आपलं काम सांभाळत अनुपम आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देताना दिसतात. त्यांचं त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. असाच एक व्हिडीओ अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या मराठमोळ्या हेअर स्टायलिस्टचं निधन, अभिनेता भावूक होत म्हणाला, “अजूनही विश्वास बसत नाही की…”

अनुपम सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. अनुपम यांचा भाऊ राजू खेर यांचा वाढदिवस होता. राजू यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम त्यांच्या कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये पोहोचले. यादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये अनुपम यांची आई जेवताना दिसत आहे. यावेळी अनुपम त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत.

पाहा व्हिडीओ

अनुपम यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, “आज राजू खेरच्या वाढदिवसादिवशी आम्ही एकत्र जेवण करत आहोत. तेव्हा मी माझ्या आईला विचारलं, तू काय पित आहेस? या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर ऐकून मी घाबरलो. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.” अनुपम यांची आई या वयातही फारच सुंदर आहे असं नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये “तू काय पित आहेस?” असं अनुपम त्यांच्या आईला विचारताना दिसत आहेत. यावर त्यांची आई म्हणते, “मी दारू पित आहे.” अगदी मजेशीर अंदाजामध्ये अनुपम यांची आई या व्हिडीओमध्ये गप्पा मारताना दिसत आहे. अनुपम यांनी आपल्या आईचा व्हिडीओ शेअर करताच काही तासांमध्येच त्याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत.