अभिनेत्री अनुषा दांडेकर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय रहात ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते. इतर सेलिब्रिटींप्रमाणे तीही न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. या वेळेचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ व्हायरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुषा दांडेकर समुद्रात सर्फिंगचा आनंद घेताना दिसतेय. सुरुवातीला अत्यंत आत्मविश्वासाने सर्फिंग बोर्डवर चढून सर्फींग करत असलेल्या अनुषाचा तोल हळूहळू बिघडत जातो आणि शेवटी स्वतःला पडण्यापासून वाचवण्यासाठी ती त्या बोर्डवरून उडी मारते. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

हेही वाचा :अभिनेत्री अनुषा दांडेकर लवकरच झळकणार मराठी चित्रपटात, ‘या’ अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका या व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “काकूंना सांगा वय झालंय तुमचं. आता असं काही करू नका. हाडं तुटली तर या वेळेस जोडता येणार नाहीत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “असं काही करू नको पडलीस तर महागात पडेल.” आता तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.