गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री अनुष्का शर्माच्या पोस्टने वेधले आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने कतरिनाची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अनुष्का म्हणाली, “तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! आशा आहे की तुम्ही दोघे आयुष्य भर एकत्र रहा, तुमच्यात कायम प्रेम राहो. याचा ही आनंद आहे की अखेर तुमचं लग्न झालं आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल आणि आता आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही.”

आणखी वाचा : पहिल्यांदा वडिलांनीच दिला होता मद्याचा ग्लास आणि ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, ट्विंकलने केला होता खुलासा

लग्नानंतर कतरिना आणि विकी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. विकी आणि कतरिना दोघेजण लग्नानंतर राहण्यासाठी घर शोधत होते. त्यांच्या घराचा शोध संपला असून त्यांनी जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. हे घर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले असून त्यासाठी मोठी रक्कम दिल्याचे समजते. आठव्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट जुलै २०२१ मध्ये भाड्याने घेतले आहे.

आणखी वाचा : कतरिनाने उचलला लग्नाच्या खर्चाचा मोठा भार, केला ७५ टक्के खर्च

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.