बॉलिवूडचा रोमॅण्टिक गायक अरिजीत सिंह सध्या अडचणीत पडलाय. त्याच्या आईची प्रकृती अचानक बिघडी असल्याने त्यांना कोलकत्ता इथल्या AMRI रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांना A निगेटिव्ह रक्ताची गरज होती. त्यातही त्यांना पुरूष रक्तदात्याच्या रक्ताची गरज होती. ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आज गायक अरिजीत सिंहने यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानत एक स्पेशल मेसेज शेअर केलाय.
गायक अरिजीत सिंहने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून हा स्पेशल मेसेज शेअर केलाय. यात त्याने लिहिलंय, ” माझ्या अडचणीच्या काळात मला मदत करणाऱ्या सर्वांना माझी एक विनंती आहे, कृपया या घटनेचा बाऊ करू नका, ते ही फक्त यासाठी की गायक अरिजीत सिंहच्या आई आहेत म्हणून, जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीचा सम्मान करायला शिकत नाहीत, तोपर्यंत आपण सध्या सुरू असलेल्या संकटातून बाहेर पडू शकत नाहीत…माझ्यापर्यंत पोहोचून मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो…पण हे मात्र लक्षात ठेवा की, आपण सर्व चालते फिरते माणूस आहोत प्रत्येक माणूस ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.”
It is my humble request to those who are trying to help me at this hour, Please Do not overdo things just because you…
Posted by Arijit Singh on Thursday, 6 May 2021
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘दिल बेचारा’ आणि ‘पाताललोक’ फेम बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. गुरूवारी सकाळी १०: ०७ वाजता ट्विटरवर पोस्ट शेअर करून गायक अरिजीत सिंहच्या आईसाठी रक्तदाताची गरज असल्याचं सांगितलं. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली.