सिनेसृष्टी म्हटलं की, अनेक महागाड्या वस्तू येतात. एखाद्या बॉलिवूड कलाकाराच्या कपड्यांपासून त्याच्या घरापर्यंतच्या अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लक्झरी गाड्या खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड कलाकार हा ट्रेंड फॉलो करत नवनवीन महागड्या गाड्या खरेदी करताना पाहायला मिळतात. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यानेही नुकतीच एक महागडी गाडी खरेदी केली आहे. त्याच्या या गाडीची किंमत ही कोट्यावधी रुपये आहे.
अर्जुन कपूर हा कारप्रेमी आहे. तो नेहमीच नवनवीन गाड्या खरेदी करत असतो. अर्जुन कपूरने नुकतीच एक नवीकोरी Maybach GLS600 SUV ही गाडी खरेदी केली आहे. त्याच्याकडे Maserati Levante,ऑडी क्यू ५, होंडा सीआर-वी आणि एक लँड रोवर या गाड्या आहेत. त्यानंतर आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या गाडीचा समावेश होणार आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे अर्जुनच्या या नवीन गाडीचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या गाडीचा नंबर. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनच्या या नव्या गाडीचा नंबर ०२९११ असा आहे. या नंबर खास असण्याचे कारण म्हणजे ती त्याच्या वडीलांचा आणि बहिणीच्या वाढदिवसाची तारीख आहे. अर्जुनची लाडकी बहिण अंशुला कपूर हिचा वाढदिवस २९ डिसेंबरला असतो. तर वडील बोनी कपूर यांचा वाढदिवस हा ११ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळेच त्याने गाडीचा नंबर हा ०२९११ असा घेतला आहे. अर्जुन कपूरच्या या नव्या गाडीची किंमत जवळपास २.४३ कोटी रुपये आहे.
दरम्यान बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन आणि मलायका अरोराची जोडी ही बॉलिवूडमधील मोस्ट रोमॅंटिक जोडी म्हणून देखील ओळखली जाते.