चित्रपटकर्ता बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये हळूहळू आपला जम बसवत असून, त्याच्या ‘२ स्टेटस्’ चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला पार केला. अन्य बॉलिवूड कलाकारांप्रमणे अर्जुन कपूरनेदेखील (arjunk26) टि्वटरवर आपले खाते उघडले आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांपासून सर्वांनी त्याचे मोठ्या उत्साहात टि्वटरवर स्वागत केले. टि्वटरवर येताच अर्जुनने “It’s meeeee.” असा पहिला संदेश बहिण अंशुला कपूरसाठी पोस्ट केला. त्याचप्रमाणे, टि्वटरवरील खाते कसे वापरावे, यासाठी आपल्याला बहिण मदत करीत असल्याचेदेखील त्याने म्हटले आहे. ‘अर्जुन कपूर टि्वटरवर !!!!’ असा संदेश पोस्ट करीत दिग्दर्शक करण जोहरने त्याचे स्वागत केले. तर, ‘जून !! तुझे स्वागत आहे !!!’ असे म्हणत अनुष्का शर्माने त्याला टि्वटरवर वेलकम केले. याशिवाय, नर्गिस फाखरी, सोनाक्षी सिन्हा, परिणिती चोप्रा, अलिया भट आणि अन्य अनेकांनी अर्जुनच्या स्वागताचे संदेश टि्वटरवर पोस्ट केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
अर्जुन कपूर टि्वटरवर, दिग्गजांकडून स्वागत
चित्रपटकर्ता बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये हळूहळू आपला जम बसवत असून, त्याच्या '२ स्टेटस्' चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला पार केला.
First published on: 25-06-2014 at 01:39 IST
TOPICSअर्जुन कपूरArjun Kapoorकरण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinhaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor joins twitter welcomed by bollywood biggies