अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली.

arjun-kapoor-
अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला करोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

अर्जुनची इन्स्टाग्राम पोस्ट-

मला करोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणे हे माझं कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहीन. माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या करोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वीच अर्जुनने शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली होती. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने फोटो पोस्ट केले होते. मात्र आता त्याला करोनाची लागण झाल्याने शूटिंग बंद करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arjun kapoor tests positive for corona virus he was shooting with rakul preet singh and neena gupta ssv

ताज्या बातम्या