बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख आणि गौरीवर दु:खाचं डोंगर कोसळं आहे. अनेक सेलिब्रिटींनी समोर येऊन शाहरूख आणि गौरीला पाठिंबा दिला आहे. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव शामिल झालं आहे.

स्वराने ट्वीटवर एक पोस्ट शेअर करत शाहरूखला पाठिंबा दिला आहे. स्वराने प्रसिद्ध कवी अखिल कटयाल यांची एक कविता रिट्वीट केली आहे. या कवितेत लिहिले आहे की “वो कभी राहुल है तो कभी राज, वो कभी चार्ली है तो कभी मॅक्स, सुरिंदर भी वो हॅरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी। वो अमर है समर है। रिजवान, रहीम, जहांगीर भी। शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है, कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है।” त्यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही कविता रिट्वीट करत स्वराने जांभळ्या रंगाचे हार्ट इमोजी वापरले आहे. स्वरा आधी शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर तसेच अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

आणखी वाचा : अमिताभनं आता तरी निवृत्ती घ्यावी, सलीम खानांचा प्रेमळ सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख एका वेगळ्या संकटातून जात असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. एनसीबीनं याप्रकरणात खोलात जात चौकशी केली आहे. त्यांनी कोर्टापुढे सादर केलेल्या पुराव्यांमुळे अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे.