शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अद्यापही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. व्हाटस्अप चॅटमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आलीय. आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आल्याने एनसीबीने तिची देखील चौकशी करण्यात आली होती.

अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात अमली पदार्थांच्या खरेदीवरून चॅट झाल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार आर्यन आणि अनन्यामध्ये ड्रग्ज संबंधी चॅट झाले होते. यातच आता आर्यनचे काही इतर चॅटही समोर आले आहेत. ज्यात आर्यनने त्याच्या मित्रांना मस्करी करत एनसीबी त्यांची चौकशी करणार असल्याचं म्हणत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केलाय.

‘इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील…’, मिका सिंग संतापला

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्यन खान अचित कुमारशी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यासाठी बोलत आहे. आर्यनने अचित कुमारकडून ८० हजार रुपयांचं ड्रग्ज मागवलं होतं. एवढचं नव्हे तर आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटच्या चौकशीत मिळालेल्या डेटामधून त्याने इतर दोन जणांशी ड्रग्जसंबधी केलेलं ग्रुप चॅट समोर आलंय. अनन्या पांडे व्यतिरिक्त आर्यन खानने आणखी तीन सेलिब्रिटी किड्ससोबत चॅट केल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. काही ड्रग पेडलर आणि सप्लायर बॉलिवूडमध्ये त्यांचा जम बसवण्यासाठी आणि ड्रग्ज विक्रिसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

“…आणि तिने सलमानसोबत पोज देण्यास नकार दिला”, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

तपास पथकाने यापूर्वीच काही आरोपींच्या व्यवहाराच्या नोंदी गोळा केल्या आहेत ज्यांच्याकडून ‘व्यावसायिक’ किंवा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. एनसीबी आरोपींच्या उत्पन्नाचे स्त्रोत देखील तपासत आहे, असे पीटीआयने म्हटले आहे. तपास पथक आरोपींच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून डिलीट करण्यात आलेले मेसेज आणि व्हॉट्सअॅप चॅट्स शोधून काढत आहे आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे का ते तपासत आहे.