बॉलीवूड अभिनेता आयुष शर्माने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केलाय. आयुषच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या ‘अंतिम’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. आयुषच्या बर्थ डेचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलंय. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

आयुष्यच्या बर्थ डे सेलिब्रेशनला सलमान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेण्ड लुलिया विंतुरने देखील हजेरी लावली होती. यावेळी गाडीतून उतरणाऱ्या सलमान खानला फोटोग्राफर्सने घेरलं. सलमान खान फोटोग्राफर्सना पोज देत असतानाच त्याची कथित गर्लफ्रेण्ड गाडीतून उतरली. मात्र ती सलमान खानसोबत फोटोसाठी नं थांबता थेट निघून गेली. यावेळी फोटोग्राफार्सनी तिला फोटोसाठी थांबण्याची विनंती केली मात्र ती थेट निघून गेली. तर सलमानदेखील वळून तिला पाहू लागला. त्यानंतर सलमान आणि लुलियाचा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सला सलामानच्या सुरक्षा रक्षकांनी हटकलं. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमान खानच्या ‘अंतिम’ सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

Aryan Khan Case: आर्यन खानची दिवाळही तुरुंगातच?; आज होणार जामीन अर्जावर सुनावणी

दरम्यान सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खानचा दबंग अंदाज पाहायला मिळतोय. तर आयुषदेखील हटके भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात सलमान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसतोय. तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.