जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अवतारच्या पहिल्या भागाने बॉक्सऑफिसवर दणक्यात कमाई केली होती. अवतारच्या कमाईचा रेकॉर्ड तब्बल १० वर्षांनी मार्वेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडला. एकूणच चित्रपटप्रेमी याच्या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचीसुद्धा चांगलीच चर्चा झाली होती.

अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करायला सुरुवात केली आहे. ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ४१ कोटींची कमाई केली. त्यामुळे आता पुढच्या दिवसात हा चित्रपट आणखी दमदार कमाई करणार असं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : चाहत्याने केली शाहरुख खानकडे ‘पठाण’ची तारीख पुढे ढकलण्याची विनंती; अभिनेत्याने दिलं भन्नाट उत्तर

दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये आणखी ५ ते १०% वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी हा चित्रपट ४२ कोटीचा आकडा पार करू शकतो असं म्हंटलं जात आहे. जर या चित्रपटाने भारताच्या दक्षिण भागातदेखील अशीच दमदार कामगिरी केली तर हे आकडे आणखी वाढतीत असा ट्रेड अभ्यासकांचा अंदाज आहे. हा चित्रपट हिंदीतही उत्तम कामगिरी करत असल्याचं चित्र समोर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या ३ दिवसांतच हा चित्रपट १२५-१३० कोटी इतकी कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय येणाऱ्या दिवसांत सुट्टी असल्याने हे आकडे चांगलेच वाढतील अशी अपेक्षा आहे. कोविड काळानंतर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं सादरीकरण लोकांना प्रचंड आवडलं आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल १३ वर्षांनीही या चित्रपटासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक आहेत.