हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘अवतार’चा सिक्वेल (Avatar 2)ची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून करत आहेत. आता अखेर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची पहिली झलक ही २७ एप्रिल रोजी लास वेगसमधील सिनेमाकॉनमध्ये दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही चाहत्यांना Pandora ग्रहाचे सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. पहिल्या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे, Pandora हा अल्फा सेंच्युरीमध्ये असलेल्या एका ग्रहाचा एक उपग्रह आहे. जिथे पृथ्वीवर जशी सजीवसृष्टी आहे तशीच तिथेही आहे. सॅम वर्दिंगटन, नावी जेक सुली आणि जॉय सल्डाना या चित्रपटात पुन्हा एकदा नेतिरीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी तो एकटा नसून त्याची मुलंही दिसणार आहेत. Pandora चे सुंदर निळे पाणी संपूर्ण चित्रपटात दिसते आणि चित्रपट एक प्रकारे या कुटुंबाभोवती फिरत असल्याचे दिसते. ट्रेलरमध्ये नावीचा एक डायलॉग देखील आहे ज्यामध्ये तो म्हणतो, ‘हे कुटूंबच आपला किल्ला आहे.

आणखी वाचा : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत ‘Major’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित!

आणखी वाचा : “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल

चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन म्हणतात की यावेळी चित्रपट पाहणे अधिक मनोरंजक असेल कारण यात हाय डायनॅमिक रेंज, हाय फ्रेम रेट, चांगले रिझोल्यूशन आणि व्हिज्युअल इफेक्टसोबत 3D वापरण्यात आले आहे. केट विन्सलेट, मिशेल यिहो, डेव्हिड थेवलीस आणि विन डिझेल हे देखील यावेळी चित्रपटात मागील कलाकारांसह दिसणार आहेत. हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.