scorecardresearch

चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयुष्मानचे शेवटचे दोन चित्रपट ‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ चांगली कमाई करू शकले नाहीत.

चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गेले काही महिने बॉयकॉट बॉलिवूडमुळे अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट अपयशी हॉट आहेत. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला या बॉयकॉट बॉलिवूडचा फटका बसला आहे. बॉलीवूड चित्रपट एका पाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. आयुष्मान खुराना त्यापैकीच एक. आयुष्मान खुरानाने त्याच्या उत्कृष्ट आणि वैविध्यपूर्ण चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आतापर्यंत त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. पण आयुष्मानचे शेवटचे दोन चित्रपट ‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ चांगली कमाई करू शकले नाहीत. त्यामुळे त्याने एक मोठा निर्णय घेतलं आहे.

आणखी वाचा : “‘RRR’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट…”, दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका

‘अनेक’ आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ हे चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे आयुष्मानचे मोठे नुकसान होत आहे. आता याच कारणासाठी त्याने मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुरानाने त्याच्या मानधनात बदल केला आहे. त्याने त्याची फी बरीच कमी केली आहे. आयुष्मान खुरानाने त्याचे मानधन २५ कोटींवरून १५ कोटी रुपये केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे ‘अनेक’ आणि ‘चंडीगढ़ करे आशिकी’ या चित्रपटांचे अपयश हे आहे.

आयुष्मानच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयुष्मानला त्याचे मानधन कमी करण्यास सांगितले आणि या कठीण काळात त्याचा पाठिंबा मागितला. त्या निर्मात्यांचे म्हणणे आयुष्मानला पटले. त्यानेही या मुद्द्यावर विचार केला आणि त्याने त्याच्या मानधनात कपात केली. आयुष्मान आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी २५ नव्हे फक्त १५ कोटी रुपये घेत आहे.

चित्रपटांना मिळणाऱ्या आपयशमुळे आपले मानधन कमी करणारा आयुष्मान हा पहिला अभिनेता नाही. याआधी अक्षय कुमारनेही त्याचे मानधन १४४ कोटींवरून ७२ कोटी रुपये केलं आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम, शाहिद कपूर आणि राजकुमार राव यांसारख्या स्टार्सनीही त्यांची फी जवळपास निम्म्याने कमी केली आहे.

हेही वाचा : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’, नुसरत नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

दरम्यान, आयुष्मान खुराना लवकरच ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरूचाच्या ऐवजी अभिनेत्री अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या