आयुष्मान खुरानाला बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आतापर्यंत आयुष्माननं वेगवेगळ्या भूमिका साकरत हीट चित्रपट दिले आहे. मागच्या बऱ्याच काळापासून त्याचा आगामी चित्रपट ‘अनेक’ची सोशल मीडियावर चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा एका अंडर कव्हर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘अनेक’च्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना शत्रूसोबत लढताना, अॅक्शन करताना आणि दारूगोळा आणि युद्धजन्य भागात बंदुक घेऊन लढताना दिसत आहे. आयुष्मानच्या दमदार डायलॉग्सनी ट्रेलरमध्ये जीव ओतला आहे. “इंडिया इंडिया इंडिया… मैं इसी इंडिया की सुरक्षा के लिए काम करता हूं नॉर्थ ईस्ट में..” हा त्याचा डायलॉग सर्वांची मनं जिंकून घेतो.

आणखी वाचा- करण जोहरसोबतच्या वादावर कार्तिक आर्यननं पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात आयुष्मान देशाच्या नॉर्थ ईस्ट भागातील लोकांसोबत होणारा भेदभाव, त्यांच्या दिसण्यावरून त्यांना हिणवलं जाणं आणि देशाची सुरक्षा या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. अनुभव सिन्हा यांनी ‘थप्पड़’, ‘आर्टिकल १५’, ‘मुल्क’ यांसारखे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. येत्या २७ मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.