Baaghi 4 Box Office Collection Day 1 : टायगर श्रॉफचा ‘बागी ४’ हा चित्रपट काल (५ सप्टेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. ए. हर्ष दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेनुसार कमाई केली आहे. ‘बागी ४’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊ.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘रेड २’, ‘जाट’, ‘सितारे जमीन पर’, ‘केसरी २’ व ‘भूल चूक माफ’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने २०२५ सालच्या टॉप १० ओपनर्समध्ये सहावे स्थान मिळवले आहे. हा चित्रपट सुमारे २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

‘बागी ४’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?

सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘बागी ४’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे १२ कोटींची कमाई केली आहे. जर लोकांना चित्रपट आवडला, तर कलेक्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘बागी ४’ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

हा टायगर श्रॉफच्या बागी फ्रँचायझीचा हा चौथा भाग आहे. ए. हर्ष दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने तयार केला आहे. टायगर श्रॉफ व्यतिरिक्त, हरनाज संधू, श्रेयस तळपदे, सोनम बाजवा आणि संजय दत्त यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटात सौरभ सचदेवा, उपेंद्र लिमये व पवन शंकर यांसारखे कलाकारदेखील आहेत. दोन तास ३७ मिनिटांचा हा चित्रपट आहे, जो देशभरातील २,७०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात संजय दत्त मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहे आणि हरनाज संधूने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. साजिद नाडियाडवाला यांनी ‘बागी ४’ची कथा लिहिली आहे.