‘बिग बॉस हिंदी’चा १६वा सीझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. गेली अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील पहिल्या स्पर्धकाची सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. ताजिकिस्तानातील गायक अब्दू रोजिक  यंदाच्या पर्वाचा पहिला स्पर्धक आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या घरात यंदा लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’च्या टीमने त्याला संपर्क केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात शिवने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. आता, त्याला  हिंदी बिग बॉसच्या घरात प्रेक्षक आतुर आहेत.

हेही वाचा >> Video : ‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह नोरा फतेहीने धरला ठेका; लावणी डान्सचा व्हिडीओ एकदा पाहाच

हेही वाचा >> Big Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो

‘एमटीव्ही रोडीज’ या रिएलिटी शोमधून शिवला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’च्या घरातील अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव यांची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. परंतु, नंतर काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले.

हेही पाहा >> Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो वादग्रस्त असला तरीही तितक्याच चवीने घराघरात पाहिला जातो. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांची मस्ती, खेळले जाणारे टास्क याची प्रेक्षकही तितकीच मजा घेताना दिसतात.