छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला मलखान फेम अभिनेता दीपेश भान याचे निधन झाले आहे. ते ४१ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश हा शनिवारी सकाळी क्रिकेट खेळत होता. यावेळी खेळता खेळता अचानक तो जमिनीवर कोसळला. बराच वेळ तो शुद्धीवर न आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर त्याच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

‘गोष्ट एका पैठणीची’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर सायली संजीव भावूक, म्हणाली “बाबांची इच्छा होती की…”

त्याच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन क्षेत्रातील सर्वांचा धक्का बसला. त्याचे अनेक चाहतेही हळहळ व्यक्त करत आहे. तर अनेक जण त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. या मालिकेत मोहनलाल तिवारी यांची भूमिका साकारणारा अभिनेता रोहितेश गौर याने दीपेश भान याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यात तो म्हणाला, “आज आम्हाला शूटवर जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे कदाचित तो जिमनंतर क्रिकेट खेळायला गेला असावा. तो नेहमी असे करायचा. मात्र आज खेळत असताना तो अचानक बेशुद्ध पडला. त्याच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला फार धक्का बसला आहे.”

दरम्यान ‘भाभीजी घरपर है’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. या मालिकेत वैभव आणि दीपेश यांची जोडी ‘टीका-मलखान’ म्हणून लोकप्रिय होती. मलखानला या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेत त्याने वैभव माथूरच्या मित्राची भूमिका साकारली होती.

68th National Film Award : मराठीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाने मारली बाजी, अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपेश गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये सहाय्यक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर दीपेशने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतसुद्धा काम केलं आहे. मात्र त्याला खरी ओळख ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेमुळे मिळाली होती. या मालिकेती मलाखन हे पात्र घराघरात प्रसिद्ध झालं होतं. मात्र आता त्याच्या अचानक जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.