बॉलिवूड सिनेमांमध्ये असो किंवा अभिनय क्षेत्रात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आजवर उघडकीस आले आहेत. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून धडपड करणाऱ्या अनेक तरुण तरुणींना या क्षेत्रात सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागतो तर अनेकांची फसवणूक केली जाते. असाच एक प्रकार सुप्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधवने नुकताच उघडकीस आणला आहे.

भरत जाधव यांच्या सिमेनात काम देण्याचं आमिष दाखवून काही एजंट अनेकांची फसवणूक करत होते. या तरुण-तरुणींना भरत जाधवच्या सिनेमासाठी सिलेक्शन झाल्याचं सांगत त्यांच्याकडून १५ हजारांची रक्कम घेतली जात होती. मात्र या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं सांगत भरत जाधव यांनी फसवणूक करणाऱ्यांपासून अनेकांना सावध केलंय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भरत जाधवने या सर्व प्रकारावरील पर्दाफाश केलाय.

नीरज चोप्राने केलं शक्ती मोहनला प्रपोज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

“काल एका व्यक्ती चा मेसेज आला की “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.” मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.” ही पोस्ट शेअर करत भरत जाधव यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

ब्रालेट परिधान केल्याने ट्रोल झालेल्या राधिका मदानचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाली “हे माझं शरीर आहे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरत जाधनवे मराठी सिनेसृष्टीसह रगंमंचावर आणि छोट्या पडद्यावर देखील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंज केलं आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत या नाटकांनी भरत जाधवला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. तर गलगले निघाले, जत्रा, श्रणभर विश्रांती, पछाडलेला, खबरदार हे भरत जाधवचे सिनेमा चांगलेच सुपरहिट ठरले आहेत.