भोजपुरी अभिनेत्री सहर आफशा सध्या चर्चेत आहे. उत्तम काम करत आपल्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचल्यानंतर या अभिनेत्रीने धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडली होती. त्यामुळे तिची खूप चर्चा झाली होती. अशातच आता तिचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. सहरने काही महिन्यांपूर्वी इस्लाम धर्मासाठी इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली होती. आता तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सहरने अरीज शेख नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मेहंदीपासून लग्नापर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पण सर्व फोटोंमध्ये एक गोष्ट निदर्शनात येते, ती म्हणजे सहर प्रत्येक फोटोमध्ये हिजाब परिधान करून दिसत आहे. सहरने ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम करत आता लग्न केल्याने ती चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, सना खानही सहरच्या लग्नाला उपस्थित होती.

९ ऑक्टोबर रोजी सहरने इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत या गोष्टीचा खुलासा केला होता. “मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की मी आजपासून मनोरंजन व्यवसायापासून फारकत घेत आहे. यापुढे इस्लाम आणि अल्लाहची सेवा हेच माझ्या जीवनाचं ध्येय असेल. मी माझ्या परमेश्वराकडे केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागते, माझ्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत,” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

तब्बल ४० जणांना घेऊन गर्लफ्रेंडला मागणी घालायला गेला होता एमसी स्टॅन; पण तिच्या आईने केलं असं काही की….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सना खान आणि जायरा वसिमनंतर सहर ही तिसरी अभिनेत्री आहे जीने केवळ धर्मासाठी स्वतःची करकीर्द संपवली. सध्या सहर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.