Nikki Tamboli Tetsed Dengue Positive : ‘बिग बॉस मराठी ५’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. निक्की तांबोळी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असते. सध्या निक्की तांबोळीला डेंग्यू झाला आहे. तिने स्वतः चाहत्यांना याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करून सांगितले की तिला डेंग्यू झाला आहे.

निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिने लिहिले की तिला डेंग्यूची लागण झाली आहे. यापूर्वी अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिला १०३.६ अंशांचा ताप होता.

यादरम्यान अभिनेत्रीने गणेश चतुर्थी उत्सवात सहभागी होऊ न शकल्याबद्दल दुःखही व्यक्त केले. अभिनेत्रीने लिहिले, “गणपती बाप्पा, कृपया मला लवकर बरे करा.. मला तुमचे दर्शन घेण्यासाठी यायचे आहे.”

निक्की अरबाज पटेलला करतेय डेट

बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वातच अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची भेट झाली. या शोमध्ये दोघे एकाच टीममधून खेळताना दिसले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या शोदरम्यान निक्की तांबोळी व अरबाज पटेल फक्त खेळासाठी एकत्र आल्याचे अनेकांनी म्हटले. शो संपल्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसतात. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करतात, ज्यावर त्यांचे चाहतेही खूप प्रेम करतात.

निक्की तांबोळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. निक्कीने काही दाक्षिणात्य चित्रपटही केले आहेत. २०१९ मध्ये तिने ‘चिकाती गडिलो चिथाकोटुडू’ या तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कांचना ३’ या ॲक्शन हॉरर चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण केले होते. तिचा तिसरा चित्रपट ‘थिप्पारा मीसम’ होता.

निक्की २०२० मध्ये ‘बिग बॉस १४’ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात भाग घेतला. मराठीतही ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती.