अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सर्वानाच खुप मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण  टीव्ही आणि चित्रपटसृष्टि त्याच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करते आहे. ‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्यने त्याच्या तुफानी सीनियरसाठी एक गाणं समर्पित केलं असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राहुल बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक म्हणून होता. याच सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला सिनीअर महणून आला होता. राहुलने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राहुल वैद्य सिद्धार्थच्या पसंतीचे गाणे गात होता. हे गाणं रणबीर कपूरचा चित्रपट ‘अजब प्रेम की गजब कहानी’ मधले राहुलने गायलेलं ‘कैसे बताए क्यु तुझको चाहे यारा’ हे गुणगुणत होता. हे गाणं गाण्या पूर्वी व्हिडिओमध्ये राहुलने हे ही सांगितलं की हे गाणं तो त्याचा मित्र आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला समर्पित करत आहे.

राहुल सिद्धार्थचा खुप जवळचा मित्र होता  बिग बॉसच्या घरात ते दोघं बरेचदा चर्चा करताना दिसायचे. राहुलने अजून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्याने सांगितले जेव्हा त्याने बिग बॉस १४ मध्येच सोडले.  तेव्हा राहुल त्याच हॉटेल मध्ये राहात होता जिथे सिद्धार्थ थांबला होता. सिद्धार्थ तिथे त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत असल्याचे त्याने या व्हिडिओ मध्ये सांगितले.  याच व्हिडिओत त्याने सिद्धार्थ शुक्लाची आई रिटा शुक्ला आणि शेहनाज गिलला भेटला असल्याचे सांगितलं. तो म्हणाला की शेहनाज पूर्णंपणे कोलमडली आहे काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

सिद्धार्थ शुक्लाच्या फॅन्सना माहिती आहे की त्याला हे गाणं किती आवडते कारण बिग बॉसच्या घरात त्याने जान कुमार सानूला अनेकदा हे गाणं म्हणायला सांगितलं होते. सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने २ सप्टेंबर रोजी निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर  सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.