बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शो ‘बिग बॉस १५’ मधील खेळाडू उमर रियाज याच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. एका फॅशन डिझायनरचे कपडे परिधान केल्यानं त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर रियाज हा बिग बॉस १५ व्या पर्वातील सर्वात लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. उमर रियाजचा चाहतावर्ग फार मोठा आहे. विशेष म्हणजे तो ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या फैजान अन्सारी याने उमर रियाजविरोधात तक्रार दाखल केली आहे. फैजान हा एक फॅशन डिझायनर आहे. त्याने उमर रियाजवर गंभीर आरोप केले आहे. उमर रियाने मी डिझाईन केलेले कपडे परिधान केले आहे, असा आरोप फैजानने केला आहे. याप्रकरणी त्याने मुंबईतील स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला आहे.

“उमर रियाज हा बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक आहे. अनेकदा तो विविध कपडे परिधान करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याने परिधान केलेल्या कपड्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. पण या सगळ्यात उमर रियाजची पीआर टीम फैजान अन्सारी याला कोणतेही श्रेय देत नाही. मी डिझाईन केलेल्या कपड्यांची जाहिरात करत नाही,” असा आरोप फॅशन डिझायनर फैजान अन्सारी याने केला आहे.

“विशेष म्हणजे उमर रियाजची पीआर टीम सोशल मीडियावर त्याने घातलेल्या कपड्याच्या फोटोला अन्य कोणत्या तरी ब्रँडच्या नावानं टॅग करत आहे. हे सर्व ‘बेकायदेशीर’ आहे,” असेही तो म्हणाला. इतकंच नव्हे तर फैजानने त्याला ‘फ्रॉड’ असल्याचेही म्हटले आहे. “लवकरच मी उमर रियाजचे खरे पात्र लोकांसमोर आणेन. तसेच उमरच्या चांगल्या व्यक्ती म्हणून वावरत असला तरी बरेच वादविवाद असून लवकरच ते उघडकीस आणेन,” असेही तो म्हणाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच याविरोधात फैजानने रस्त्यावर उतरून उमरचा निषेध नोंदवला आहे. हातात ‘बॉयकॉट उमर’ असे फलक घेऊन तो रस्त्यावर उतरला होता. त्याचा हा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अद्याप उमर रियाजकडून किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही