छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच बिग बॉस १५ च्या घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एण्ट्री झाली. यात बिग बॉसच्या घरात बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या पतीसह सहभागी झाली. यामुळे सध्या सर्वत्र राखी सावंत आणि तिच्या पतीविषयी चर्चा सुरु आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सलमान खानने राखी सावंतला तिच्या पतीविषयी संशय निर्माण करणारा प्रश्न विचारला आहे.

गेल्या २ वर्षांपासून राखी ही पती रितेशचा चेहरा पाहण्याची वाट पाहत होती. आता रितेशने चक्क ‘बिग बॉस १५’ मध्ये एण्ट्री करत राखी त्यांच्या लग्नाविषयी खोटं बोलत नव्हती हे सिद्ध केलं आहे. दरम्यान यावेळी सलमान खानने राखी सावंतला पती रितेशबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी सलमान म्हणाला की, “अखेर राखीने तिच्या पतीला बिग बॉसमध्ये आणून सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. पण रितेश खरच तुझा नवरा आहे की तू कोणाला भाड्याने पैसे देऊन नवऱ्याचा अभिनय कर, असं सांगितले आहेस,” असा संशयास्पद प्रश्न सलमानने विचारला. सलमानचा हा प्रश्न ऐकून सर्वजण हसायला लागले.

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘सुहागरात’; राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत

यानंतर राखीने तिच्या पतीची ओळख करुन दिली आणि म्हणाली, “रितेश तुझा मेहुणा आणि माझा एकुलता एक नवरा आहे”. यानंतर सलमानने रितेशला त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल विचारले. त्यावर रितेश सलमानला म्हणाला की, “मी एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे आणि मूळचा बिहारचा आहे. पण सध्या बेल्जियममध्ये राहतो,” असे त्याने सांगितले.

हेही वाचा : घटस्फोटानंतर समांथाने घेतली नागार्जुनची भेट, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला माझे लग्न झालंय हे स्वीकारण्यास फार भीती वाटत होती. माझ्या लग्नाचे काही फोटो उघड करण्याची भीती वाटत होती. यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. पण गेल्या काही भागात राखी भर शो मध्ये रडत असल्याचे पाहून मला फार वाईट वाटले. विशेष म्हणजे तिचे लग्न झाले हे सांगूनही कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकांनी तिला खोटी म्हटलं,” असेही तो म्हणाला. यानंतर रितेशने गुडघ्यावर बसून राखीला प्रपोज केले आणि पुढील सात जन्म तिचा पती होण्याचे वचन दिले. दरम्यान हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.