बिगबॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या यशाच्या शिखरावर आहे. बिगबॉसचं विजेतेपद मिळवल्यानंतर तिला लगेचच एकता कपूरच्या ‘नागीन ६’ मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासूनच ती तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या आयुष्यात कराव्या लागलेल्या समस्यांचा उल्लेख केला आहे.

या मुलाखतीत तिने, तिला बारीक असल्यामुळे किती त्रास सहन करावा लागला याबद्दल भाष्य केले आहे. ई-टाइम्ससोबत बोलताना तिने सांगितले, बॉडी शेमिंग हे फक्त जाड असणाऱ्या व्यक्तींसोबतच होत नाही तर बारीक असणाऱ्या व्यक्तींनाही याचा सामना करावा लागतो. तिने सांगितले की तिच्या कमी वजनामुळे तिला अनेक नकारात्मक कमेंट यायच्या. परफेक्ट दिसण्यासाठी आजकाल अनेकजण सर्जरी करून घेतात याबद्दल तेजस्वीने आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणते हा अतिशय सोप्पा मार्ग आहे. पुढे तिने सांगितले की ती खूपच आत्मविश्वासू आहे आणि ती जशी आहे त्याच्या तिला अभिमान आहे. कोणी काहीही म्हणत असेल तरी त्याचा तिला विशेष फरक पडत नाही. तसेच, इतर महिलांना तिने स्वतःवर प्रेम करण्याचा आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा सल्ला आणि आवाहन केले आहे.

दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली प्राजक्ता कोळीच्या कार्याची दखल; महिला दिनी केला सन्मान

तेजस्वी पुढे म्हणते, “माझे शरीर जसे आहे किंवा देवाने मला जसे बनवले आहे त्याबद्दल मला सुरवातीपासूनच खूप अभिमान आहे. देवाला मी अशीच व्हायला हवे होते. जर लोकांना हे आवडत नसेल, तर त्याला मी काहीही करू शकत नाही. या गोष्टी दुरुस्त करणे हे माझ्या हातात नाही. प्रत्येक महिलेने स्वतःवर प्रेम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःवर आणि तुमचे शरीर जसे आहे त्यावर प्रेम करत नसाल, तर तुम्ही दुसरे तुमच्यावर प्रेम करतील अशी अपेक्षा कशी करू शकता? मी जशीही आहे त्याचा मला अभिमान आहे. जर कोणीही मला हिणवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण मला माहित आहे मी कोण आणि काय आहे. याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही आणि भविष्यातही होणार नाही.”

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बॉसमध्ये आल्याचे तेजस्वीला तीन फायदे झाले आहेत. यातील पहिला फायदा म्हणजे ती या शोची विजेती ठरली. दुसरा फायदा म्हणजे एकता कपूरच्या नागिन ६ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर तिसरा फायदा म्हणजे तिचे आणि करण कुंद्राचे रिलेशनशिप. नुकतेच ते दोघे त्यांचा नवीन अल्बम ‘रुला देती हैं’ मध्ये एकत्र दिसले.