Bigg Boss 19 Contestant Fees : अभिनेता सलमान खानचा वादग्रस्त ‘बिग बॉस १९’ शो आता चर्चेत येऊ लागला आहे. शो सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील शोमध्ये काही प्रसिद्ध चेहरे आहेत. शोमध्ये प्रत्येकाने आपल्या खास अंदाजात खेळ सुरू केला आहे. तसेच स्पर्धकांच्या फीबद्दलची चर्चा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
स्क्रीनमधील एका अहवालानुसार, गौरव खन्ना हा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक आहे, त्यानंतर अमाल मलिक आहे. ‘अनुपमा’ अभिनेता ‘बिग बॉस १९’च्या घरात राहण्यासाठी दर आठवड्याला १७.५ लाख रुपये घेत आहे.
सूत्रांनी सांगितले की, शोमध्ये गौरवचे प्रतिदिन मानधन २.५ लाख रुपये आहे. या मोठ्या रकमेव्यतिरिक्त, ‘बिग बॉस’मधील प्रवास संपल्यानंतर गौरवला स्टार किंवा कलर्समध्ये शो करण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.
‘बिग बॉस १९’च्या त्याच्या फीसह, गौरव बिग बॉसच्या इतिहासातील टॉप १० सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. गौरव व्यतिरिक्त अमाल मलिक हा या सीझनमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये आहे. अमाल एका आठवड्यासाठी ८.७५ लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस १९’मध्ये त्याचे प्रतिदिन मानधन १.२५ लाख रुपये आहे. अवेज दरबार आणि अशनूर कौर यांना दर आठवड्याला ६ लाख रुपये मिळतात. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी हे शोमधील सर्वात कमी कमाई करणारे स्पर्धक आहेत.
टेलिव्हिजनवरचा स्टार अभिनेता गौरव खन्नाने आतापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये चांगले मुद्दे मांडले आहेत. अनुपमा सीरियलमध्ये त्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर त्याला बिग बॉसच्या घरामध्येदेखील प्रेक्षक पसंत करत आहेत.
गौरव खन्नाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘अनुपमा’ मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे तो चर्चेत आला. त्यामध्ये त्याने अनुपमाच्या दुसऱ्या पतीची अनुज कपाडियाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर तो ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये झळकला.