Bigg Boss 19 First Look Out : ‘बिग बॉस १९’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शोच्या निर्मात्यांनी अखेर सीझन १९ चा पहिला लूक रिलीज केला आहे. यावेळी शोचा आयकॉनिक ‘आय’ लोगो बदलण्यात आला आहे.
निर्मात्यांनी लोगोला एक बोल्ड आणि रंगीत डिझाइन दिले आहे, जे आगामी सीझनच्या उत्साह, नाट्य व ट्विस्टची झलक देते. हा शो ऑगस्ट २०२५ मध्ये प्रीमियर होईल आणि सलमान खान होस्ट राहील.
जिओ हॉटस्टारने ‘बिग बॉस १९’चा पहिला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहून चाहते उत्सुक आहेत. लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘काउंटडाउन सुरू झाले आहे, लवकरच अराजकता अनलॉक होईल.’
या थीममध्ये काय खास आहे?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूर्वी या थीमला ‘रिवाइंड’, असे म्हटले जात होते; परंतु आता हे निश्चित झाले आहे की, यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) हा शोचा एक महत्त्वाचा भाग असेल. नवीन सीझनमध्ये केवळ तांत्रिक बदल होणार नाहीत, तर शोच्या फॉरमॅटमध्येही मोठा बदल होईल.
या शोमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतात?
दरवर्षीप्रमाणे यावेळीही स्पर्धकांबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस ताजा खबर’ या फॅन पेजनुसार, यावेळी टीव्ही जगतातील आणि डिजिटल जगतातील अनेक प्रसिद्ध नावे शोमध्ये दिसू शकतात. रति पांडे, हुनर अली, अपूर्वा मुखिजा, मिस्टर फैसू, धनश्री वर्मा, श्रीराम चंद्र, मीरा देवस्थले, भाविका शर्मा हे या शोमध्ये सहभागी होऊ शकतात.
असेही म्हटले जात आहे की, हा सीझन आतापर्यंतचा सर्वांत लांब सीझन असेल, जो सुमारे पाच महिने चालेल आणि तो प्रथम ‘जिओ सिनेमा’वर प्रसारित केला जाईल. त्यानंतर दीड तासाने तो ‘कलर्स टीव्ही’वर प्रसारित केला जाईल. सलमान खान पहिले तीन महिने हा शो होस्ट करेल. त्यानंतर फराह खान, करण जोहर व अनिल कपूर पुढील दोन महिने या शोचे होस्टिंग करतील. त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सलमान या हंगामात १५ आठवडे हा शो होस्ट करेल. एका सूत्राने सांगितले की, सलमानला दर आठवड्याला सुमारे ८ ते १० कोटी रुपये मिळतील. एकूणच त्याचे मानधन १२० ते १५० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. यापूर्वी सलमानला ‘बिग बॉस १८’साठी २५० कोटी आणि ‘बिग बॉस १७’साठी २०० कोटी रुपये मिळाले होते.