Bigg Boss 19 : ‘बिग बॉस १९’ या रिअॅलिटी शोच्या नवीनतम भागात अभिषेक बजाज आणि शहबाज बादशाह यांच्यात जोरदार वाद झाला. हे सर्व तेव्हा सुरू झाले, जेव्हा शहबाजने ‘हमारा बजाज’ची छेड काढली आणि त्याला अशनूर कौरशी जोडले. अभिषेकला हे आवडले नाही आणि त्याने शहनाज गिलला वादात ओढले.

अभिषेक बजाजने ‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक शहनाज गिलचा भाऊ शहबाज बादशाहला सांगितले की, “तू वरपासून खालपर्यंत बनावटपणाचे दुकान आहेस…बहिणीने मला तिथे फेक वाग असे सांगितले, असं तू म्हणालेला.”

शहनाज गिलचे नाव ऐकून भाऊ शहबाज संतापला

अभिषेकच्या या कमेंटने शहबाजला राग आला. तो रागावला आणि ओरडला, “जर तू माझ्या बहिणीचा उल्लेख केलास तर मी तुझा जबडा फाडेन.” त्याने अभिषेकला धमकीही दिली आणि शोमधील वादात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ओढू नये असे सांगितले. तो म्हणाला, “तिने मला फक्त एवढेच सांगितले की जर मला या गेममध्ये लोकांची मने जिंकायची असतील तर मला नेहमीच प्रामाणिक राहावे लागेल आणि माझे खरे रंग दाखवावे लागतील.”

अभिषेकने माफी मागितली

त्यानंतर अभिषेकने शहबाजची माफी मागितली आणि स्पष्ट केले की त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. शहबाजने वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. शहनाज गिल स्वतः त्याला स्टेजवर घेऊन आली होती. शहबाज यापूर्वी स्टेजवर हजर झाला होता. ग्रँड प्रीमियरच्या दिवशी त्याच्या आणि मृदुल तिवारीमध्ये वोटिंग झाले होते. मृदुलला जास्त मते मिळाली आणि त्याला ‘बिग बॉस १९’च्या घरात ठेवण्यात आले.

‘बिग बॉस १९’चा हा सीझन यंदा चांगलाच गाजत आहे. शहबाजची बहीण शहनाजने ‘बिग बॉस १३’ गाजवलं होतं. शहनाजला ‘बिग बॉस १३’नंतर खूप प्रसिद्धी मिळाली आणि आज ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन शहबाज ‘बिग बॉस १९’ गाजवणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.