रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना-सलमान ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. ब्रेकअपनंतर कतरिनाने लगेचच घेतलेली सलमानची भेट आणि बिग बॉसच्या सेटवर तिच्या दिसण्यामुळे या दोघांत पुन्हा प्रेमप्रकरण सुरु होतय की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
कतरिना नुकतीच बिग बॉस कार्यक्रमात आगामी चित्रपट ‘फितूर’ च्या प्रसिद्धीसाठी गेली होती. तेव्हा सलमानने तो कतरिनासाठी वेडे असल्याचे सांगितले. सलमान म्हणाला की, माझ्यासह संपूर्ण भारत तुझ्यासाठी क्रेझी आहे. यावर कतरिनाही लाजून हसताना दिसली. याचसोबत सलमानने कतरिना ही एक सशक्त स्त्री असल्याचेही म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2016 रोजी प्रकाशित
कतरिना मी तुझ्यासाठी ‘क्रेझी’ आहे – सलमान खान
सलमानने कतरिना ही एक सशक्त स्त्री असल्याचेही म्हटले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 25-01-2016 at 15:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 9 finale i am crazy about you katrina says salman khan