बिग बॉस नऊचा ‘डबल ट्रबल’ सिझन समाप्तीकडे झुकला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात प्रेक्षकांचेही डबल मनोरंजन होणार आहे. अंतिम सोहळ्यात सलमान खानसोबत त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ हीदेखील झळकणार आहे .
रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने सलमानची भेट घेतली होती. त्यामुळे नवीन चर्चांना उधाण आलेले असतानाचं हे दोघे आता छोट्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.  कतरिनाचा ‘फितूर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यात ती चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी येणार आहे. आदित्य रॉय कपूर आणि कतरिनाचा डान्स परफॉर्मन्सही यावेळी पाहता येईल.
बिग बॉसच्या नवव्या पर्वाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. कीथ सिकेरा घरातून बाहेर पडल्यामुळे प्रिन्स नरुला, ऋषभ सिन्हा, रोशेल मारिया राव आणि मंदाना करीमी हे चार स्पर्धक घरात आहेत. यांच्यातच हा अंतिम विजेते पदासाठीचा खेळ रंगणार आहे.