‘बिग बॉस ओ़़टीटी’ चा स्पर्धक राकेश बापट हा शो मधील सर्वात चर्चीत सदस्यांपैकी एक आहे. त्याच्या शो मधील परफॉर्मन्समुळे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शो मध्ये त्याचे नाव शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सोबत जोडले जात आहे. त्या दोघांमधील असलेला बॉण्ड देखील चाहत्यांना फार आवडला आहे. तसंच राकेशने तो शमिताच्या प्रेमात पडला असल्याची कबूलीही दिली आहे. राकेश बापटचे लग्न सुप्रसिध्द आभिनेत्री रिध्दी डोगरा सोबत झाले होते. मात्र काही करणामुळे त्यांचा घटस्फोट झाला. तुम्हाला माहिती आहे का राकेशच्या पूर्वाश्रमीची पत्नी रिध्दा डोगराचे दिवंगत भाजप नेते अरूण जेटली यांच्याशी एक खास कनेक्शन आहे.
अभिनेता राकेश बापटने त्याच्या करिअरची सुरूवात चित्रपटातून केली असली तरी त्याला खरी ओळख ही मालिकांमुळे मिळाली आहे. ‘सात फेरे:सलोनी का सफर’, ‘बहु हमारी रजनीकांत’ सारख्या अनेक मालिकांमधून त्याने प्रक्षकांची मने जिंकली आहेत. ‘मर्यादा लेकिन कब तक?’ या मालिकेच्या दरम्यान राकेश आणि रिध्दी डोगराची भेट झाली. पहिले मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर नंतर २०११ साली ते लग्न बंधनात अडकले. मात्र काही कारणांमुळे २०१९ साली ते वेगळे झाले. महत्वाचे म्हणजे राकेशची पूर्वाश्रमीच्या पत्नी रिध्दी ही दिवंगत भाजप नेते अरूण जेटली यांची भाची आहे. म्हणजे अरूण जेटली यांची पत्नी ही नात्याने रिध्दीची आत्या आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
राकेश आणि रिध्दी जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्यातील मैत्रीचे नाते हे कायम आहे. राकेश जेव्हा ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात होता तेव्हा रिध्दीने त्याला खूप सपोर्ट केला होता. त्याच्यावर आरोप करणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे. दरम्यान काल ‘बिग बॉस ओटीटी’ चा महाअंतिम सोहळा पार पडला. ‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेतेपदावर दिव्या अग्रवालने आपलं नाव कोरलं आहे. या शोमध्ये विजेतेपद पटकावत दिव्याने ट्रॉफीसह २५ लाख रुपये रक्कम जिंकली. तर या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली.