यंदाचा बिग बॉस शो टीव्हीवर येण्याआधीपासूनच धमाल करण्यासाठी सज्ज झालाय. येत्या ८ ऑगस्टपासून हा शो वूट अॅपवर सुरू होणारेय. बिग बॉस ओटीटीवर करण जोहर हा शो होस्ट करताना दिसून येणार आहे. एक तासाच्या एपिसोड व्यतिरिक्त या शोमधील सर्व स्पर्धकांना २४ तास लाइव्ह पाहता येणार आहे. टीव्हीच्या आधी सहा आठवड्यांआधीच सुरू होणाऱ्या या बिग बॉस ओटीटीला मेकर्सनी आणखी मजेदार बनवणार आहेत. बिग बॉसचं नवं घर कसं असेल, या घरात कोण कोण असणार, कोणते नविन नियम असतील असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतीलच. नुकतंच बिग बॉसच्या घराचा एका व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये बिग बॉसच्या घराची पहिली झलक पहायला मिळतेय.

वूटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस ओटीटीच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये नव्या घराचा कोपरा न् कोपरा दाखवण्यात आलाय. ‘आत्ता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत’ अशी कॅप्शन देत त्यांना हा व्हिडीओ शेअर केलाय. घराची पहिली झलक दाखवताना बॅकग्राऊंडला कभी ख़ुशी कभी गम’ हे गाणं ऐकू येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

बिग बॉसच्या नव्या घरचं डिझाइन खूपच कुल दिसतंय. यंदाच्या सीजनमध्ये घरातील सिटिंग अरेंजमेंट आणि फर्नीचर डॅशिंग पद्धतीने केलंय. किचन, डायनिंग एरिया, गर्डन एरिया सर्व काही अतिशय आकर्षक दिसत आहे.

आणखी वाचा : बिग बी फ्रेंच दाढी का ठेवतात? ही केवळ त्यांची फॅशन नव्हे तर यामागे एक रहस्य आहे…

‘बिग बॉस ओटीटी’ हा शो फिल्म निर्माता करण जोहर होस्ट करणार आहे. यावेळी हा शो टीव्हीपेक्षा खूपच धाडसी असणार आहे, असं सांगत करण जोहरने त्याच्या प्रोमोमध्ये सांगितलं आहे. प्रोमोमध्ये करण म्हणतो, ‘सलमान टीव्हीवर सूट-बूटमध्ये आणि मी ओटीटी वूटवर बिग बॉस होस्ट करणार आहे. माझ्याबरोबर बिग बॉस ओटीटीची मजा लूट पहिल्यांदा 24 ×7…”