टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चं सुत्रसंचालन प्रसिद्ध फिल्म निर्माता करण जोहर करतोय. बिग बॉस ओटीटीच्या सुरूवातीपासूनच त्याच्यावर आरोपांना सुरूवात झाली होती. त्याच्यावरील हे आरोपसत्र बिग बॉस ओटीटीच्या घरात सुद्धा सुरू झालंय. या शोमधील दोन आठवडे पूर्ण झाले असून नुकतंच ‘संडे का वार’ हा एपिसोड झाला. संडे का वारमध्ये सुत्रसंचालक करण जोहर स्पर्धकांना धारेवर धरत असतानाच प्रेक्षकांनी त्याच्यावर आरोप केले आहेत. फक्त दर्शकच नव्हे तर शोमधील स्पर्धकांनी सुद्धा त्याच्यावर आरोप करण्यास सुरूवात केलीय.
बिग बॉस ओटीटीच्या संडे कार वारमध्ये बरेच तिखे वार पहायला मिळाले. या एपिसोडमध्ये सुत्रसंचालक करण जोहर आणि स्पर्धक दिव्या अग्रवाल या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही दिवसांपूर्वीच दिव्या म्हणाली होती की, तिला करणलाच नॉमिनेट करायचंय. यावर करण जोहर भडकला आणि संडे का वारमध्ये हा विषय काढला. यावर बोलताना करणने दिव्या खूप सुनावलं. तसंच “बिग बॉसने तुला एक स्पर्धक म्हणून आणि मला एक सुत्रसंचालक म्हणून बोलावलंय. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये ही रेघ कायम असणार आहे. जर मला आदर देण्याची तुझी इच्छा नसेल तर माझा उल्लेख सुद्धा करू नको” असे खडेबोल दिव्याला सुनावले.
करण जोहरने संडे का वारमध्ये दिव्यानंतर जीशान खानवर सुद्धा आपला निशाणा साधला. करण जोहरने जीशानला सर्वात मागे बसवलं. एक दिवसापूर्वीच जीशान आणि अक्षरा या दोघांमध्ये वाद झाला होता. यात दोघांनीही एकमेकांवर शाब्दिक वार केले होते. यावरून करण जोहरने जीशानला धारेवर धरलं. त्यानंतर करणने जीशानला त्याच्या जागेवरून उठवलं आणि सर्व स्पर्धकांच्या मागे बसवलं.
View this post on Instagram
यावेळी जीशानने आपलं म्हणणं मांडण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण करणने जीशानला बोलण्याची देखील संधी दिली नाही. याविषयावर तो घरातील सदस्य मिलिंद गाबासोबत चर्चा करताना दिसून आला. यावेळी जीशान खूपच डिस्टर्ब झालेला दिसून आला होता. “माझ्या केवळ एका वाक्यासाठी मला ‘Misogynist’ ठरवलं गेलं आणि अक्षराकडून मला जे जे हजार शब्द वापरले गेले त्याचा उल्लेख कुठेच नाही.”, असं जीशान यावेळी बोलताना दिसून आला. जीशानच्या या मताशी मिलिंद गाबा सुद्धा सहमत होताना दिसला.
आणखी वाचा : रुबीना दिलैक आणि जेठालालमध्ये ‘हे’ आहे साम्य; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
‘संडे का वार’च्या एपिसोडमध्ये पहिल्यापासून ते शेटवपर्यंत करण जोहर शमिता शेट्टीला सपोर्ट करताना दिसून आला. मिलिंद गाबा म्हणाला, “शमिताने निशांतला बोलताना अपशब्द वापरले, त्यानंतर माफी सुद्धा मागतली, त्याचा करण जोहरने स्वीकार देखील केला. पण जेव्हा निशांतने माफी मागितली त्यावेळी करणे याचा स्वीकार नाही केला.” यावरून मिलिंदने सुद्धा करण जोहरवर बायस्ड असल्याचा आरोप केला.
बिग बॉस ओटीटीमधून रिद्धिमा पंडित आणि करण नाथ या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. रिद्धिमा पंडित ही बिग बॉस ओटीटीमधील सर्वात चर्चेत आलेली स्पर्धक ठरलीय.