बॉलिवूडमधील हॉट जोडी बिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर हे कायमच चर्चेत असतात. बिपाशा -करण यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६मध्ये अखेर ते विवाहबंधनात अडकले. लग्नानंतरही ही जोडी अनेक कारणांनी चर्चेत राहिली होती. मध्यंतरी बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, या वृत्ताला बिपाशाने पूर्णविराम दिला आहे.
बिपाशा आणि करणने नुकताच आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त या ‘मंकी कपल’ने आपल्या इंस्टा अकाऊंटवर एकमेकांना शुभेच्छा देत पुन्हा एकदा एकमेकांप्रती प्रेम व्यक्त केले आहे. तर बिपाशाने आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. बिपाशा आणि करणने जवळच्या मित्र- मैत्रीणींसह गोव्यामध्ये वाढदिवस सेलिब्रेट केल्याचे दिसून आले.
बिपाशा आणि करणची मैत्री ‘अलोन’ चित्रपटावेळी झाली होती. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ३० एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले. बिपाशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली असून ‘अजनबी’ चित्रपटामध्ये तिने नकारात्मक भूमिका केली होती.
१ जून रोजी करणचा ‘३ देव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटामद्ये त्याच्यासह केके मेनन, रवी दुबे आणि कुणाल रॉय कपूर झळकणार आहेत.