आलिया भट्ट, रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्रने’ बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला. बॉयकॉट ट्रेंडमुळे चर्चेत असलेला हा चित्रपट चालणार की नाही याबाबत शंका होती. मात्र बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चाही समावेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. त्यातच पहिल्या भागाला मिळालेले यश बघता आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पुढील भागाची घोषणा केली आहे.
पहिल्या भागात या जोडीच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरुख खानसारखे दिग्गज कलाकार दिसले आहेत. पुढील भागात दीपिका पदुकोण दिसणार आहे अशी चर्चा असताना आता अभिनेता आमिर खानदेखील दुसऱ्या भागाचा हिस्सा असणार अशी चर्चा सुरु झाली आहे. करण जोहरचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. करण जोहरने २०१८ साली ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि करण जोहर दिसले आहेत. या फोटोला कॅप्शन देखील करणने दिला आहे की, The biggest BLOCKBUSTER ever!!!!! मग हा जुना फोटो का व्हायरल होत आहे अशी शंका तुमच्या मनात आली असेल तर नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुसऱ्या भागातील कलाकारांबद्दल अजून पुरेशी माहिती दिग्दर्शकाने उघड केली नाही. नेटकऱ्यांनी या फोटोवरून खुलासा केला आहे की कदाचित ४ वर्षांपूर्वी या चित्रपटातील कलाकारांची निवड झाली होती.
आमिरची प्रेयसी म्हणून गिरीजा ओक नव्हे तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला पहिली पसंती होती
‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आमिर खान असणार अशी चर्चा आहे. फोटोमधील बाकीचे कलाकार आधीच्या म्हणजे पहिल्या भागात दिसले आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे आगामी काळातच समजणार आहे.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने ७ मोठे विक्रम मोडले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या भुलभुलैय्या २ ला मागे टाकले आहे.परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ दिसून येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे