बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन. बिग बी यांचे देशासह जगभरात चाहते आहेत, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र अमिताभ बच्चन यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीमुळे त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर आता स्वतः बिग बी यांनी उत्तर दिले आहे.
बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असतात, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखील देताना दिसतात. बिग बी यांनी एका पान मसाला कंंपनीची जाहिरातीत काम केले आहे. ही जाहिरात पाहिल्यावर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. अमिताभ यांच्या फेसबूक अकाऊंटच्या पोस्ट वर एका युजरने लिहिलं, “नमस्कार सर तुम्हाला ही जाहिरात करायची अशी काय वेळ आली आणि मग तुमच्यात आणि इतर कलाकारांमध्ये काय फरक?”.
View this post on Instagram
या युजरच्या कमेंटला अमिताभ यांनी सविस्तर उत्तर देत लिहिलं, मला माफ करा कोणत्या व्यवसायाला कमी जास्त मानू नये, आपल्या मुळे जर का एखाद्याचे भलं होतं असेल तर ते करायला हरकत आहे. जर एखादा व्यवसाय असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल देखील विचार करावा लागतो. आता तुम्हाला असे वाटते की मी ही जाहिरात करायला नको होती पण, मला यासाठी मानधान मिळते. आमच्या व्यवसायात काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांना रोजगार आणि मानधन मिळतं आणि माझं काही चुकलं असेल तर पुन्हा मला माफ करा. ”

अमिताभ बच्चन यांचे हे उत्तर वाचून चाहते त्यांची स्तुती करत आहेत. दरम्यान, अमिताभ लवकरच ‘ब्रम्हास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’, ‘मे डे’, ‘गुड बाय’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या व्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १३’चे सुत्रसंचालनही करत आहेत.