बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. परंतु, अनिल कपूर चित्रपट किंवा वक्तव्यामुळे नाही एका फोटोमुळे चर्चेत आले आहेत. हुबेहुब अनिल कपूर यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोतील व्यक्तीची आणि अनिल कपूर यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

फोटोतील व्यक्ती अनिल कपूर यांची कार्बन कॉपी असल्याचं भासत आहे. या व्यक्तीचं नाव जॉन एफर असं असून तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. फिटनेस ट्रेनर असणाऱ्या जॉन एफरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये जॉन त्याचे सिक्स पॅक्स अप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने अनिल कपूर यांना टॅग करत बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. “मी खरं तर बॉलिवूड कॉलची वाट पाहत आहे. अनिल कपूर उत्तम अभिनेता आहे, असं माझे वडील म्हणायचे”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> मातृत्वाच्या संवेदनशील विषयाला प्रसाद खांडेकरचा विनोदी तडका; ‘कुर्रर्र’ नाटक ‘या’ दिवशी टीव्हीवर पाहता येणार

हेही वाचा >> Koffee With Karan 7 : वरुण धवनने अर्जुनलाच केलं ट्रोल, उत्तर ऐकून अनिल कपूर म्हणाले “तो माझा पुतण्या…”

नेटकऱ्यांनीही या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत “जॉनिल कपूर”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “तुला वन टू का फोर आणि फोर टू का वन हे बोलता आलं पाहिजे. #झकास”, अशी मजेशीर कमेंट केली आहे. एका युजरने “पहिल्यांदा अनिल कपूर क्लीन शेव आणि छातीवर केस नसलेले पाहिले”, अशी कमेंट केली आहे. परंतु अनिल कपूर यांनी त्याच्या पोस्टवर कोणतीही कमेंट केलेली नाही.

हेही पाहा >> Photos : ‘फॅमिली अस्र’, आलिया-रणबीरने घेतली बॉडीगार्डच्या कुटुंबियांची भेट, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या कार्बन कॉपीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनिल कपूर यांच्या जुडवाचा फोटो व्हायरल झाल्याने ते चर्चेत आहेत. अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहेत. त्यांचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ते लवकरच रणबीर कपूरबरोबर अनिमल चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. याशिवाय हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटातही ते दिसणार आहेत.