बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. तो सतत त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा गीतकार प्रियांका शर्माने रणदीपवर केलेल्या आरोपांनंतर सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी रणदीपला कोर्टान नोटीसही बजावली आहे.

रणदीपवर प्रियांका शर्माने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणदीपवर हरयाणामधील गीतकार आणि पटकथाकार प्रियांका शर्माने फसवणुकीचा आरोप केला आहे. काही प्रोजेक्टसाठी रणदीपने होकार दिला होता. मात्र ते काम अद्याप करण्यात आले नाही असा आरोप प्रियांकाने केला आहे. त्यासोबतच इतर काही आरोप देखील प्रियांकाने केले आहेत. प्रियांकाच्या वकिलाकडून रणदीपबरोबरच त्याच्या सहकाऱ्यांना देखील कोर्टाद्वारे नोटीस पाठवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

पटकथाकार प्रियांकाने नमूद केलेल्या नोटिसमध्ये लिहिले की तिने रणदीप हुड्डाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्याने तिला आश्वासन दिले होते की तो लवकरच तिच्या स्क्रिप्टवर काम सुरू करेल. तिने असा ही दावा केला आहे की १ हजार २०० गाणी आणि ४० स्टोरीची स्क्रिप्ट ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारा रणदीपसह आशा हुडा, मनदीप हुडा, अंजली हुड्डा, मनीष, रणदीपची मॅनेजर पांचाली चौधरी, मेकअप आर्टिस्ट रेणुका पिल्लईला पाठवल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे प्रियांकाचा असा दावा आहे अनेक वर्ष उलटून गेली तरी रणदीपने अजून काम सुरू केलं नाही. जेव्हा तिने त्या स्क्रिप्ट परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जीवे मारायची धमकी देण्यात आली. प्रियांकाच्या वकिलांनी या सगळ्या छळा विरोधात १० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

दरम्यान अभिनेता रणदीप हुड्डा सलमान खान आणि दिशा पटानी सोबत ‘राधे:युआर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये विरोधी भूमिका साकारताना दिसला होता. तसंच तो लवकरच इलियाना डिक्रूझसोबत आगामी ‘अनफेयर अँड लव्हली’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.