अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या चित्रपटांमुळे, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तिचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिचे एका पाठोपाठ एक चित्रपट येत आहेत. आज जरी ती यशाच्या शिखरावर असली तरी तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणे सोपे नव्हते.

तिने मागे पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, ‘बर्‍याच लोकांना वाटते की धोनी हा माझा पहिला चित्रपट होता पण धोनीच्या एक वर्ष आधी फग्ली नावाचा चित्रपट केला होता. माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ तो होता. मला दुसरी संधी मिळेल का? माझ्या करिअरचे काय होईल? मला आणखी एक संधी मिळेल का? असे अनेक प्रश्न मला पडले होते. बऱ्याच जणांना वाटते की मी सलमान सरांना ओळखते, म्हणून मला काम मिळतात पण गोष्टी तितक्या माझ्यासाठी सोप्या नव्हत्या. मी जरी त्यांना ओळखत असले तरी अक्षय सरांनी मला माझ्या पहिल्या (फग्ली) चित्रपटासाठी मार्गदर्शन केले होते’.

“मला त्यावेळी शाहिदच्या कानशिलात…” कियाराने सांगितला कबीर सिंगच्या चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा

कियारा अडवाणीने २०१४ मध्ये ‘फग्ली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असताना, कियाराने नीरज पांडे यांच्या एम. एस. धोनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूत सोबत दिसली होती. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि कबीर सिंग, गुड न्यूज आणि शेरशाह यासारखे हिट चित्रपट दिले आहेत.

कियारा मूळची मुंबईची आहे. हिंदी चित्रपटात काम करण्याआधी तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कबीर सिंग, शेरशहा चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. तिचे चाहते आता नव्या चित्रपटाची वाट बघत आहेत.