आपल्या नेहमीच्या व्यस्त वेळातून वेळ काढत अनेक कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही मालदिवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. याचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अवघ्या काही तासांपूर्वी साराने समुद्रात जेट स्की करतेवेळीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
सारा नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना पाहायला मिळते. सध्या ती मालदिव व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता साराने जेट स्की करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आम्ही आमच्या जेट स्कीवर निघालो आहेत. समुद्र आणि आम्हा तिघींसाठी काही तरी साहसी करण्याची वेळ आहे. मोकळ्या हवेत केस उडत असले, तरी आम्हाला फार मोकळं वाटत आहे. आम्ही हसतोय, गातोय आणि कदाचित त्यामुळे आम्हाला जगण्याची आणि प्रेम करण्याची आणखी एक संधी मिळतं आहे. विशेष म्हणजे माझ्या मैत्रिणींनी हे फार सोप्पं केलं आहे. त्यांच्यासोबत मजा, मस्ती करण्याची १०० टक्के गॅरंटी आहे, असे कॅप्शन साराने या व्हिडीओला दिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान काही दिवसांपूर्वी साराने सूर्यास्ताची मज्जा घेतानाचे काही फोटो पोस्ट केले होते. “भविष्यात काही चांगल्या गोष्टी घडतील ही अपेक्षा सतत आपल्या मनात असते. त्यामुळे आपल्याला वारा, समुद्राच्या लाटा आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू येत नाही,” असे अनोखे कॅप्शन तिने तिच्या फोटोला दिले होते. साराने शेअर केलेल्या या फोटोत ती पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्टस परिधान केल्याचे दिसत आहे. यातील एका फोटोत ती समुद्रकिनाऱ्यावर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत ती समुद्राच्या दिशेने तोंड करुन शांत बसलेली दिसत आहे. या दरम्यान तिने सूर्यास्त, सायकलिंग यांसह अनेक गोष्टींची मज्जा अनुभवल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.