बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना दिसते. सारा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते. सारा सोशल मीडिया अकाऊंटवर फिरतानाचे किंवा सुट्ट्यांचे फोटो पोस्ट करताना दिसते. नुकतंच साराने मालदिव व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
साराने इन्स्टाग्रामवर मालदिवचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती सूर्यास्ताची मज्जा घेताना पाहायला मिळत आहे. “भविष्यात काही चांगल्या गोष्टी घडतील ही अपेक्षा सतत आपल्या मनात असते. त्यामुळे आपल्याला वारा, समुद्राच्या लाटा आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू येत नाही,” असे अनोखे कॅप्शन तिने तिच्या फोटोला दिले आहे.
View this post on Instagram
साराने शेअर केलेल्या या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्टस परिधान केली आहे. यातील एका फोटो ती समुद्रकिनाऱ्यावर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत ती समुद्राच्या दिशेने तोंड करुन शांत बसलेली दिसत आहे. या दरम्यान तिने सूर्यास्ताची मज्जाही अनुभवली आहे.
तर अवघ्या काही मिनिटांपूर्वी तिने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यात ती मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर झोपाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्यासोबतच तिने सायकलिंग करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. यात तिने निळ्या रंगाची शॉर्टस आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप शर्ट घातला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंना काही मिनिटात लाखो लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सारा ही लडाखला गेली होती. त्यावेळीही तिने मंदिरासह नदी किनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत ‘निसर्ग सुख शांती’, असे कॅप्शन साराने दिले होते.
View this post on Instagram
दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.