बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. नुकतेच तिचे कार्तिक आर्यनबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील पहिल्या फोटोत कार्तिकचा संपूर्ण चेहरा दिसत नाहीये. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिक आणि सारा एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे.फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघंही पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच तिच्याबरोबर विमानतळावर एक घटना घडली आहे.

सारा नुकतीच विमानतळावर परतली आज तिच्या आईचा म्हणजे अमृता सिंग यांचा वाढिदवस, तिने आपल्या कामातून वेळ काढत आईच्या वाढदिवसानिमित्त मुंबई गाठली. नुकताच तिचा विमानतळावरचा व्हिडीओ झाला आहे. यात तिने पांढरा ड्रेस आणि गुलाबी रंगाचा स्कार्फ परिधान केला आहे. विमानतळावरून बाहेर पडताना ती चाहत्यांना सेल्फी देत होती. एका चाहतीने तिच्याशी हात मिळवला. आणि ती चाहती जात असताना तिच्याकडून साराचा स्कार्फ खेचला गेला त्यामुळे सारा सावध झाली. मात्र तरीदेखील या कृतीनंतर तिने चाहत्यांना सेल्फी दिले.

“त्याचं उद्धट वागणं…” अभिषेक बच्चनच्या वर्तनावर अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

सारा बरोबर ही घटना घडताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “ती बाई नक्की काय करत होती?” तर दुसऱ्याने लिहले आहे “तिला बहुतेक साराच स्कार्फ चोरायचा होता.” आणखीन एकाने लिहले आहे, “सारा खूपच साधी आहे.” एकाचे म्हणणे आहे सारा खूपच घाबरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.